satyaupasak

“गणवेश योजनेत अनियमितता; आदित्य ठाकरेंकडून केसरकरांवर गंभीर आरोप,,

Nagpur : राज्यातील महायुती सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना सुरू केली होती. मात्र, महायुती सरकार 2 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ही योजना गुंडाळत नवी नियमावली बनवली आहे. या योजनेतील गणवेश वाटपात होणारा विलंब, गणवेशाचा दर्जा, मोजमाप यामध्ये ताळमेळ नसून योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे, ही योजना वादात सापडली होती, अखेर या योजनेत काही बदल केले आहेत. त्यावरुन आता शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी देखील माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच, या योजनेत तत्कालीन मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मलई खाल्लीय, असा गंभीर आरोपही ठाकरे यांनी केला.

राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेतंर्गत सुरुवातीला राज्यातील बचतगटांना गणवेश तयार करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, या गणवेशांचा निकृष्ट दर्जा आणि कमी-जास्त मोजमाप यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला, अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती. त्यामुळे ही योजना वादात सापडली होती. आता, फडणवीस सरकारमधये ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेत काही बदल केले आहेत. त्यावरुन, आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर यांना लक्ष्य केलं.

केसरकरांनी मलई खाल्ली

एक राज्य एक गणवेश योजनेत अनियमितता असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. राज्य सरकारने आता ती योजना स्क्रॅप केली आहे. या खात्याचे संबंधित मंत्री केसरकर यांनी त्यात मलई खालीय त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच, धस साहेबांनी बीडची गुन्हेगारी व परळी पॅटर्न समोर आणल्याचंही ते म्हणाले.

बीडचं प्रकरण आम्ही सोडणार नाही

स्वच्छ कारभार चालवायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यावर कारवाई करावी, ज्याची हत्या झाली तो भाजपचा कार्यकर्ता होता. मग भाजप कार्यकर्त्यांनी का काम करावे. तसेच, पिकविमा प्रकरणाची देखील चौकशी व्हायला हवी. एका माजी मंत्र्याला तर बाहेर ठेवले गेलंय. परंतु एकाला मंत्री केलंय, बीडचा विषय आम्ही सोडणार नाही.

एकनाथ शिंदे दिल्लीपुढे झुकले

मुंबईचे पैसे एमआरआरडीएला द्यायचा काय प्रश्न येतो. बीएमएसीचा पैसा आवडत्या कंत्राटदारांसाठी वापरला. एकनाथ शिंदे स्वत: तर दिल्लीपुढे झुकलेच, पण मुंबईलाही झुकवले, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *